पुणे सातारा रोडवर १४ बस जळून खाक

0
850

पुणे, दि. २० (पीसीबी) – शहराजवळील सातारा रोडवरच्या शिंदेवाडीत बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास एका गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या एसटीच्या शिवशाहीसह ६ खासगी बसने अचानक पेट घेतला. यामध्ये या सर्व बसेस जळून खाक झाल्या आहेत.

अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहराजवळील सातारा रोडवरच्या शिंदेवाडीत बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. येथील एका खासगी गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी शिवशाहीच्या २ आणि ४ खाजगी बस उभ्या होत्या. या आगीच्या झळा गॅरेजमध्ये असणार्‍या इतर ८ गाड्यांना देखील बसल्या आहे. त्यामुळे या गाड्यांचेही काही प्रमाणात नुकसान झाल्याचे अग्निशामकच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.