Pune

पुणे शहरात मनसेला गळती सुरू

By PCB Author

April 08, 2022

पुणे, दि. ८ (पीसीबी) – पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अजून एक धक्का बसला आहे. मनसेच्या पुणे शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन बशीर सय्यद यांनी राजीनामा दिला असून शहरात मनसे गारद झाल्याचं चित्र आहे. शहराध्यक्ष वसंत मोरे यांची पदावरून हकालपट्टी झाली. त्यानंतर पक्षांतर्गत वातावरण आणखी तापलं आहे. नवनियुक्त शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्याकडे राजीनामा दिला आहे.

पक्ष स्थापन झाल्यापासून आत्ताच जर पाडव्याच्या वेळी मजिदी च्या भुंग्याचा त्रास होत असेल तर नक्कीच काहीतरी चुकीचं होत आहे असं मत त्याने मांडलं आहे. याआधी देखील मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. राज ठाकरेंनी केलेल्या त्या विधानानंतर अनेक कार्यकर्ते नाराज आहेत.