Pune

पुणे शहरातील या भाजप आमदाराचे वडिलांचे कोरोनामुळे निधन

By PCB Author

July 05, 2020

पुणे, दि.5 (पीसीबी): पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर बनत चालले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. कोरोनामुळे मृत्यू कमी झाले आहेत. विशेषतः जेष्ठ नागरिकांनी अधिक सजग राहण्याची आवश्यकता आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता शैलेश टिळक यांचे वडील वसंतराव लिमये (वय ८५) यांचा शुक्रवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. मुक्ता टिळक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे.

त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. वसंतराव लिमये हे सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या आयोजनात ५० वर्षांपासून कार्यरत होते. ते भारतीय नौदलाच्या विक्रांत या लढाऊ नौकेवर काही काळ कार्यरत होते. वसंतराव लिमये यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.