पुणे शहरातील कोरोना रोखण्यासाठी आता हा पॅटर्न

0
209

पुणे, दि. १७ (पीसीबी) : कोरोना विषाणूचा संसर्ग काही कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाही आहे. त्यामुळं आता पुण्यातील अ़डचणी आणखी वाढताना दिसत आहेत. त्याच धर्तीवर आता खुद्द उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी मुंबई पॅटर्नचा अवलंब करण्याचे निर्देश दिले आहेत.

पुणे जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या संसर्गावर आळा घालण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासोबतच कोरोना चाचणी, रुग्णवाहिका व्यवस्थापन, रुग्णालयातील बेड व्यवस्थापन आणि डॉक्टर याबाबतचे सर्व नियोजन संगणकीय प्रणालीव्दारे करा तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे मुंबईच्या धर्तीवर तातडीच्या रुग्णालयांची उभारणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

कोरोना प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठकीत बोलत होते. बैठकीला मुंबईचे आयुक्त इकबाल सिंह चहल, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे उपस्थित होते.

पुण्यात वाढणारा कोरोनाचा प्रादुर्भाव कोणत्याही परिस्थितीत आणखी वाढणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे, कोरोनाच्या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी नियोजन महत्त्वाचे आहे असा सूर पवार यांनी आळवला.