Pune

पुणे विमानतळावर महिलेकडून ९० लाखांचे सोने जप्त

By PCB Author

November 19, 2018

पुणे, दि. १९ (पीसीबी) – लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका महिलेकडून तब्बल ९० लाख रुपये किमतीचे सोन जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई रविवारी (दि.१८) कस्टम विभागाकडून करण्यात आली.

याप्रकरणी डॅनटसा ज्युनेका जॉन नावाच्या महिलेला अटक करण्यात आली आहे.

कस्टम विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुबईहून स्पाईसजेटने पुणे विमान तळावर उतरलेल्या डॅनटसा हिच्यावर संशय आल्याने विमानतळावरील सुरक्षा रक्षकांनी तीला ताब्यात घेतले होते. कस्टम अधिकाऱ्यांनी तीची अंगझडती घेतली असता तिच्या जवळ ९० लाख रुपये किमतीचे २ किलो ७९१ ग्रॅम सोने पकडण्यात आले. हे सोने तीने वितळवून प्लास्टिकच्या ४ पिशव्यांमध्ये ठेवले होते. त्यानंतर त्या पिशव्या शरीराला घट्ट बांधल्या होत्या. दरम्यान, कस्टम विभागाने हे सोने जप्त करुन आरोपी डॅनटसाला अटक केली आहे.