पुणे विभागातील 895 ने कोरोना बाधित रुग्णांची वाढ

0
277

पुणे, दि.23 (पीसीबी) :- पुणे विभागात काल (सोमवार) च्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 895 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 701, सातारा जिल्ह्यात 95, सोलापूर जिल्ह्यात 68, सांगली जिल्ह्यात 11 तर कोल्हापूर जिल्ह्यात 20 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील 5 लाख 82 हजार 683 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 6 लाख 8 हजार 286 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 340 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 16 हजार 263 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.67 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.79 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 99 हजार 308 रुग्णांपैकी 3 लाख 82 हजार 909 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 7 हजार 299 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 100 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.28 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.89 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 57 हजार 932 रुग्णांपैकी 55 हजार 142 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 948 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 842 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 52 हजार 456 रुग्णांपैकी 49 हजार 816 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 813 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 827 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 384 रुग्णांपैकी 46 हजार 507 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 120 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 757 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 50 हजार 206 रुग्णांपैकी 48 हजार 309 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 160 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 737 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 784 आहे. पुणे जिल्हयामध्ये 671, सातारा जिल्हयामध्ये 25, सोलापूर जिल्हयामध्ये 56, सांगली जिल्हयामध्ये 13 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 19 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 39 लाख 49 हजार 793 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 6 लाख 8 हजार 286 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.