पुणे विभागातील 15 लाख 85 हजार 356 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 16 लाख 60 हजार 131 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव

0
216

पुणे, दि. 20 : पुणे विभागातील 15 लाख 85 हजार 356 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 16 लाख 60 हजार 131 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 40 हजार 355 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 34 हजार 420 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.07 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.50 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 38 हजार 982 रुग्णांपैकी 10 लाख 11 हजार 686 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 9 हजार 828 आहे. कोरोनाबाधित एकूण 17 हजार 468 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.68 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.37 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 85 हजार 270 रुग्णांपैकी 1 लाख 72 हजार 361 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 518 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 391 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 59 हजार 960 रुग्णांपैकी 1 लाख 53 हजार 199 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 443 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 318 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 35 हजार 525 रुग्णांपैकी 1 लाख 22 हजार 712 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 947 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 866 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 40 हजार 394 रुग्णांपैकी 1 लाख 25 हजार 398 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 10 हजार 619 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 377 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 4 हजार 278 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 205, सातारा जिल्ह्यात 899, सोलापूर जिल्ह्यात 354, सांगली जिल्ह्यात 770 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 50 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 5 हजार 357 आहे. पुणे जिल्हयामध्ये 1 हजार 605, सातारा जिल्हयामध्ये 836, सोलापूर जिल्हयामध्ये 527, सांगली जिल्हयामध्ये 907 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 1 हजार 482 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 98 लाख 99 हजार 354 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 16 लाख 60 हजार 131 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

(टिप :- दि. 19 जून 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)