पुणे लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादीचा अद्यापही दावा कायम

873

पुणे, दि. १६ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार  नसल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही राष्ट्रवादीने पुण्याच्या जागेवर अद्यापही दावा कायम ठेवला आहे. माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्यानंतर काँग्रेसकडे लोकसभा लढवण्यास सक्षम उमेदवार नाही, असे कारण देत पुण्यात राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. त्यासाठी विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकीत पडलेल्या मतांच्या टक्केवारीचा दाखला दिला जात आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागा वाटपच्या बैठकीत पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादी ठाम असल्याचे सांगितले जात आहे. तर काँग्रेस ही जागा राष्ट्रवादीला सोडण्यास तयार नाही.    

पुण्यातून लोकसभा निवडणूक लढविण्यास सुरेश कलमाडी यांच्यानंतर काँग्रेसकडे ताकदीचा उमेदवार  नाही.  पुण्यात काँग्रेसची अवस्था तोळमासा झाली आहे. तर गेल्या दहा वर्षात पुण्यात राष्ट्रवादीचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यासाठी विधानसभा व महापालिकेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला पडलेल्या मतांची आकडेवारी   दिली जात आहे. तर पुणे हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकमेव लोकसभेची जागा काँग्रेस राष्ट्रवादीला सोडण्यास  नाही. मात्र, काँग्रेसकडे  खासदार होण्याच्या पात्रतेचा उमेदवार नाही, तर राष्ट्रवादीकडे तगडा उमेदवार आहे, असा दावा पक्षाचे नेते अजित पवार यांनी केला आहे.

दरम्यान, पुण्यातून लोकसभा लढवण्यास राष्ट्रवादीकडून राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांच्यासह अनेक नेते पुढे येऊ शकतात. त्याचबरोबर अन्य इतर  इच्छुक तयार होऊ शकतात. मात्र, हे सक्षम उमेदवार नसल्याने अजित पवार यांच्याकडे नेमका  कोण सक्षम उमेदवार आहे. याबाबत अंदाज बांधले जात आहेत. तर अनेक  बांधकाम व्यावसायिक इच्छुक असल्याचे सूत्रांकडून  सांगितले जात आहे.