पुणे येथे धुनिभांडीचे काम करणाऱ्या गरजू महिलांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप

0
540

 

पुणे, दि.१ (पीसीबी) – कोरोना या आजाराचा संसर्ग रोखण्याकरिता देशभरात २१ दिवसाचा बंद पाळण्यात आला आहे. बंदच्या काळात शहरातील सर्व दुकाने, हाॅटेल व टपर्‍या बंद असल्याने वाटसरू नागरिक व शहरातील हातावर पोट असणारे गोरगरीब यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये याकरिता शहरातील व परिसरातील गोरगरीब नागरिक, कातकरी व आदिवासी समाज यांना देखील मदत करण्यासाठी विविध संघटना पुढे सरसावल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर कोरोना व्हायरस मुळे शासनाने दिलेल्या आदेशाने सर्व सामान्य परिवाराच्या मदतीच्या स्वरूपात पुणे येथील शिवाजीनगर फर्ग्युसन कॉलेज शेजारी वाडारवाडी येथे मॉडेल कॉलनी शेजारील झोपडपट्टीत घुनिभांडी चे काम करणाऱ्या गरजू महिलांना सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ येमुल, चातु:शृंगी पोलीस स्टेशनचे  पोलिस हेडकोन्स्टेबल प्रकाश आव्हाड आणि त्यांचे सहकारी कार्यकर्ते यांच्याकडून फुलाची पाकळी म्हणून जीवनावश्यक वस्तू किराणा राशन व भाजीपाला या वस्तूचे वाटप केले.

माझ्या महिला भंगिनिना छोटीशी मदत. सहकार्य तर कायमच रहाणार असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ येमुल आणि यांच्या सहकारी कार्यकर्ते यांच्याकडून करण्यात आले आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ येमुल, चातुःशृंगी पोलिस स्टेशनचे पोलिस हेडकोन्स्टेबल प्रकाश आव्हाड, सहकारी कार्यकर्ते उपस्थित होते.