Banner News

पुणे-मुंबई रेल्वे मार्ग तांत्रिक दुरुस्ती १५ दिवसांसाठी बंद

By PCB Author

July 24, 2019

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर तांत्रिक दुरुस्ती आणि अन्य कामांसाठी १५ दिवसांसाठी रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. लोणावळा ते कर्जतदरम्यान दुरुस्तीचे काम होणार असल्याने २६ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान ही वाहतूक बंद असणार आहे.

याचा फटका सिंहगड आणि प्रगती एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे. या दोन्ही गाड्या आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याशिवाय १३ गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला असून या गाड्या पुण्यापर्यंत तसेच पुण्याहून पुढे धावणार आहे. कोयना, सह्यादी, महालक्ष्मी एक्स्प्रेस यांच्या मार्गात बदल करण्यात आला असून मुंबईहून सुटणाऱ्या या गाड्या पुण्याहून सोडल्या जातील. याशिवाय पुणे-पनवेल-पुणे शटल सेवा सुद्धा रद्द करण्यात आली आहे. तसेच भुसावळ गाडी मनमाड मार्गे धावणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी या काळात पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.