पुणे भाजप शहराध्यक्षपदी आमदार माधुरी मिसळ यांची वर्णी

0
945

पुणे, दि. १९ (पीसीबी) –  पुणे भाजप शहराध्यक्षपदी आमदार माधुरी मिसळ यांची आज (सोमवार)   निवड करण्यात आली. मिसाळ पुणे शहराच्या भाजपच्या पहिल्या महिला अध्यक्षा ठरल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मिसाळ यांची निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे.  

माधुरी मिसाळ  पर्वती विधानसभा मतदारसंघातून सलग दोनवेळा आमदार  म्हणून निवडून आल्या आहेत. तसेच पुणे महापालिकेत त्या नगरसेविका देखील होत्या.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील यांनी  मिसाळ यांना निवडीचे पत्र दिले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पातळीवर  पदाधिकाऱ्यांची निवड केली जात  आहे.  यात आमदार माधुरी मिसाळ यांची शहराध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली आहे.