पुणे, पिंपरी चिंचवड मधील उद्योग बंदच राहणार

0
684

पश्चिम महाराष्ट्रात 27 उद्योग तर औरंगाबादमध्ये बजाजसह 50 कंपन्या पुन्हा सुरु

पुणे, पिंपरी चिंचवड मधील उद्योग बंदच राहणार

 

पुणे, दि.२५ (पीसीबी) पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रातील या पाच जिल्ह्यांमधील २७ मोठे  उद्योग पुन्हा सुरु करण्यात आले आहेत. लॉकडाऊनच्या काळातील सर्व नियम आणि अटी पाळून काम सुरु करण्यास या उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे. पुणे विभागाचे उद्योग सहसंचालक सदाशिव सुरवसे यांनी ही माहिती दिली आहे.दरम्यान पुणे, पिंपरी चिंचवड हद्दीतील उद्योग मात्र अजूनही बंदच राहणार आहेत.

या पाच जिल्ह्यांमधील औषधं आणि अन्न प्रक्रिया करणारे एक हजार चारशे पन्नास उद्योग लॉकडाऊनच्या कालावधीतच टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आले आहेत. ज्यामधे 53 हजार कामगार काम करत आहेत. आता त्यामध्ये सत्तावीस मोठ्या उद्योगांची भर पडली आहे. 27 उद्योगांमुळे एक हजार 900 कामगारांना पुन्हा रोजगार उपलब्ध झाला आहे. या कामगारांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था कामाच्या ठिकाणीच करण्याच्या अटीवर हे उद्योग सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील वालचंद नगरमधील पेन्ना सिमेंट, बल्लारपूर पेपर्स तर सोलापूर मधील अल्ट्रा टेक सिमेंट, जुआरी सिमेंट, बिर्ला सिमेंट, छट्टीनाड सिमेंट तसेच कोल्हापूर शहरातील  इंडो काऊंट, किर्लोस्कर ऑईल इंजिनिअर्स सांगलीतील  किर्लोस्कर इंडस्ट्रीज, सातारा मधील कमिन्स उद्योग समूहाचे तीन प्रकल्प सुरू राहणार आहेत. औरंगाबादमध्ये बजाजसह 50 कंपन्या सुरु करण्याला परवानगी मिळाली आहे.