पुणे जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समिती सदस्यपदी डॉ. श्याम अहिरराव यांची निवड

0
974

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – पुणे जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीच्या सदस्यपदी डॉ. श्याम अहिरराव यांची निवड करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी ही निवड केली आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक तसेच पुणे जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समिती व सदस्य सचिव डॉ. ए. बी. नांदापुरकर यांनी डॉ. अहिरराव यांना निवडीचे दिले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व क्षेत्रातील लोकांना वैद्यकीय उपचारासाठी लागणारी मदत आणि मार्गदर्शनाकरीता डॉ. श्याम अहिरराव हे नेहमीच सहकार्य करीत असल्याने त्यांची पुणे जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीवर निवड करण्यात आली आहे.