पुणेकरांनो सावधान! दिवसात 399 ची भर

0
325

पुणे, दि. 26 (पीसीबी): पुणेकरांनो सावधान, असे म्हणायची वेळ आली आहे. कारण सोमवारी दिवसभरात सर्वाधिक ३९९ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. दिवसभरात १७५ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आणि दहा रुग्णांचा मृत्यू झाला.

महापालिकेने दिलेल्या अहवालात१७९ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू असून त्यापैकी ४४ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत असे सांगण्यात आले.

पुण्यातील एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या तब्बल ५,१८१ पर्यंत पोहली आहे. आता रोज 300-400 पर्यंत रुग्णची भर पडत असल्याने परिस्तिती चिंताजनक आहे.

उपचार घेणारे डॉ. नायडू हॉस्पिटल आणि खासगी हॉस्पिटल ४,७३५ आणि ससून ४४६ मधे आहेत.
पुण्यातील एकुण ॲक्टिव्ह रुग्ण संख्या २,१८२ ,एकूण मृत्यू २६४ तर आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज २,७३५ मिळाले आहेत.