पुढच्या वर्षीही विठुरायाच्या महापूजेचा मान मला मिळेल – मुख्यमंत्र्यांना विश्वास

0
549

पंढरपूर, दि, १२ (पीसीबी) – आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात शासकीय महापूजेला आले असता, पुढच्या वर्षी पुन्हा विठुरायाच्या महापूजेचा मान मिळेल आम्हालाच मिळेल, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेआहे.  आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पंढरपुरात महापूजा झाली, महापुजेनंतर ते बोलत होते.

अनंत रुपाचे सार | अनंत तीर्थाचे माहेर | अनंती अपार तो हा | कटी कर ठेवूनी उभा ||

अनंत तीर्थींचे माहेर असलेल्या पंढपुरात अठ्ठावीस युगांपासून कमरेवर हात ठेवून भक्तांची वाट पाहत असलेल्या सावळ्या विठूरायाच्या पालख्यांसमेवत हरिनामाचा जागर करीत १० लाखांची वैष्णांची मांदियाळी गुरुवारी पंढरीत दाखल झाली असून चंद्रभागेच्या वाळवंटाला जणू वैष्णावांचा महापूर असल्याचे चित्र पाहयळा मिळत आहे.

दरम्यान आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात विठूमाउलीची शासकीय महापूजा पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते ही शासकीय महापूजा पार पडली. तर लातूरमधील अहमदपूरचे रहिवासी विठ्ठल चव्हाण तसेच त्यांच्या पत्नी प्रयागाबाई चव्हाण यांना वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून पूजेला बसण्याचा मान मिळाला.

रात्री सव्वादोन वाजता या महापूजेला सुरवात झाली तर पहाटे ३ वाजता विठूरायाची महापूजा संपन्न झाली. विठूमाऊलीच्या मूर्तीला पंचांमृताने स्नान घालून चंदनाचा लेप लावून महापूजा केली तसेच तुळशीच्या हारांनी मूर्तींना सजवण्यात आले. महापुजेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते, त्यावेळी पुढच्या वर्षी पुन्हा विठुरायाच्या पूजेचा मान मिळेल, अशी आशा व्यक्त केली. इतकेच नव्हे तर विठ्ठल तसेच विठ्ठलरुपी जनतेचे आशीर्वाद गेल्या वेळी मिळाले होते, असेही त्यांनी म्हंटले. याचबरोबर राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, राज्यातील दुष्काळ दूर होऊ दे, बळीराजा सुखी होऊ दे, असे साकडे मुख्यमंत्र्यांनी विठुरायाकडे घातलं.