Pune

पी जी मालकीण आणि तरुणीने चोरला भाडेकरू तरुणीचा लॅपटॉप

By PCB Author

October 12, 2021

हिंजवडी, दि. १२ (पीसीबी) – पी जी तत्वावर राहणाऱ्या तरुणीच्या खोलीतून पी जी मालकीण आणि एका तरुणीने लॅपटॉप चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 10) दुपारी पावणे चार ते रात्री दहा वाजताच्या कालावधीत जयरामनगर, हिंजवडी येथे घडली.

पुनम राजाभाऊ भिसे (वय 25, रा. जयराम नगर हिंजवडी, मूळ रा. भिसे वाघोली, जि. लातूर) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. 11) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लक्ष्मी व्यंकट मल्यालम (वय 23, रा. जयराम नगर, हिंजवडी), निकिता देशमुख (पूर्ण पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पूनम या आरोपी लक्ष्मी यांच्या येथे पी जी तत्वावर राहतात. निकिता देशमुख व पीजी मालकीण लक्ष्मी यांनी संगणमताने रविवारी (दि. 10) फिर्यादीच्या खोलीतून 35 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.