Desh

पी. चिदंबरम यांना जामीन; पण २४ ऑक्टोबरपर्यंत ईडीच्या कोठडीत

By PCB Author

October 22, 2019

नवी दिल्ली,  दि. २२ (पीसीबी) –  माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी दोन महिन्यांनंतर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. सीबीआयच्या खटल्यात त्यांची जामिनावर सुटका होणार आहे. मात्र २४ ऑक्टोबरपर्यंत ते ईडीच्याच कोठडीत असणार आहेत.

आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयने पी चिदंबरम यांना १ लाखाच्या जात मुचलक्यावर जामीन दिला आहे. जामिनानंतर  चिदंबरम तिहार जेलमध्ये राहणार आहेत. कारण २४ ऑक्टोबरपर्यंत ते ईडीच्या कोठडीत राहणार आहेत.

२० ऑगस्टला दिल्ली हायकोर्टाने पी चिदंबरम यांचा जामीन नामंजूर केला होता. त्यानंतर सीबीआयने चिदंबरम यांची कोठडी मागितली होती. २१ ऑगस्टला सीबीआयने पी चिदंबरम यांना अटक केली होती. २२ ऑगस्टला सीबीआयने कोर्टात त्यांना हजर केले. सीबीआयने कोर्टात ५ दिवसासाठी त्यांची कोठडी मागितली होती.