पी.चिदंबरम यांचा पाठलाग करुन सीबीआयने केले अटक

0
318

दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – आय़एनएक्स मीडिया घोटाळ्य़ाप्रकरणी काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सीबीआयने पाठलाग करुन अटक केली.

पी. चिदंबरम गेल्या २७ तासांपासून बेपत्ता होते. ते थेट बुधवारी रात्री माध्यमांसमोर आले. त्यांनी रात्री सव्वाआठच्या सुमारास नवी दिल्ली येथील काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. अवघ्या सहा मिनिटे चाललेल्या या पत्रकार परिषदेत चिदंबरम यांनी त्यांच्यावर असलेल्या आरोपांचे खंडन केले. चिदंबरम माध्यमांसमोर येताच सीबीआयचे पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस मुख्यालयात पोहोचले. परंतु चिदंबरम सीबीआयच्य़ा हाती लागले नाहीत. उलट ते घरी पळाले.

सीबीआयसोबतच ईडीची टीम चिदंबरम यांच्या निवासस्थानी पोहोचली. परंतु सीबीआयला चिदंबरम यांच्या घरात जाण्याची परवानगी मिळाली नाही. परिणामी सीबीआयच्या पथकाला चिदंबरम यांच्या घराच्या प्रवेशद्वारावरुन आणि भिंतीवरुन उड्या मारुन घरात प्रवेश करावा लागला आहे. त्यानंतर सीबीआयच्या टीमने चिदंबरम यांना रात्री सव्वादहाच्या सुमारास ताब्यात घेतले.