Notifications

‘पी. एम. नरेंद्र मोदी’ एकाच दिवशी धडकणार ४० देशांमध्ये

By PCB Author

May 20, 2019

मुंबई, दि. २० (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीमुळे प्रदर्शन लांबणीवर पडलेला पी.एम. नरेंद्र मोदी हा बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २४ मे रोजी भारतासह तब्बल ४० देशांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मोदी यांची व्यक्तीरेखा साकारणारा अभिनेता विवेक ऑबेरॉयनं नागपूरात ही माहिती दिली. २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पी.एम. नरेंद्र हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.