पीसीबी टुडे आणि देवदत्त फोटोग्राफी आयोजित `दि क्युटेस्ट बेबी कॉम्पिटीशन`ला भरभरून प्रतिसाद; स्पर्धेची मुदत २५ जुलै पर्यंत वाढविण्यात आली

0
241

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – धकाधकीच्या जीवनात आजकाल आई आणि बाबा आपल्या लाडक्या मुलांसाठी सर्व काही देता देता, वेळ मात्र देऊ शकत नाहीत. मुलांना भविष्यात सर्व काही देता यावं या ओढीने पळताना मात्र लहानपणीचा तो काळ कधीही संपतो कळतच नाही, आणि हातात हात घेऊन चालणारी ती चिमुकली मूठ कधी मोठी होते हे कळतच नाही, ती निरागसता, तो खोडकरपणा ते चिमुकले डोळे आणि ते गोबरे गाल आपण नंतर या सर्वानाच मिस करतो, पण हेच रम्य बालपणाचे क्षण जपून ठेवले तर मात्र आपल्याला चिंरंतन आनंद देतात.

आपल्या बाळाचे असे गोड संस्मरणीय क्षण टिपून सर्वांना आनंद देण्यासाठी बरोबर महिन्यापूर्वी आपले पीसीबी टुडे आणि देवदत्त फोटोग्राफी इन्स्टिट्यूट च्या वतीने `दि क्युटेस्ट बेबी कॉम्पिटीशन` ची घोषणा आम्ही केली होती. पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि राज्यातूनही त्याला अगदी भरभरून प्रतिसाद मिळाला. बहुसंख्या पालकांनी या स्पर्धेची मुदत वाढविण्याची आग्रही मागणी आमच्याकडे केली. त्यानुसार या स्पर्धेची मुदत २५ जुलै पर्यंत वाढविण्यात येत आहे. स्पर्धेचा निकाल २५ जुलै रोजी सायंकाळी जाहीर कऱणार आहोत. तोपर्यंत येणारे सर्व फोटो स्विकारले जातील याची नोंद घ्यावी.

स्पर्धेसाठी पाच वर्षापर्यंतच्या बालगोपाळांचे फोटो अपेक्षित आहेत. ज्या फोटो अथवा व्हिडिओला सर्वाधिक लाईक्स मिळतील ते बालक विजेते असेल. विजेत्या फोटोमधील बाळाला देवदत्त फोटोग्राफी कडून एक सुंदर फोटोसेशन करून मिळणार आहे. दोन ड्रेस वर फोटोशूट व 30 hd क्वालिटी फोटो, व एक वॉटरप्रूफ पानांचा सुंदर अल्बम हे अगदी मोफत मिळणार आहे. देवदत्त फोटोग्राफी ही फोटोग्राफी क्षेत्रातील 25 वर्षपासून काम करणारी अग्रगण्य संस्था आहे. देवदत्ता फोटोग्राफिसाठी संपर्क क्रमांक 9850600625 तर ⭐Website www.devdattaphotography.com आहे.