Maharashtra

पीडितेला मुख्यमंत्रीनिधीतून मदत

By PCB Author

February 05, 2020

वर्धा, दि.५ (पीसीबी) – विदर्भातील  हिंगणघाट येथे एका प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून जाळण्याच्या घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या घटनेतील पीडितेवर योग्य ते उपचार करावेत, असे निर्देश देतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यांनी तिच्या उपचारांचा सर्व खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून करण्यात येईल, असे स्पष्ट मंगळवारी केले. या प्रकरणातील आरोपीस कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांनी व्यवस्थित तपास करावा, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी संबंधितांना दिल्या आहेत.