Pimpri

पीएमपी बसची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी

By PCB Author

October 20, 2020

चाकण, दि. २० (पीसीबी) – पुणे-नाशिक महामार्गावरून जाणा-या पीएमपी बसने एका दुचाकीला लेन बदलत असताना धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी (दि. 18) सकाळी साडेदहा वाजता वाकी फाटा, बस स्टॉपजवळ झाला.

रविकांत सोपान नाईकरे (वय 27, रा. वाडा रोड, माळीमळा, ता. खेड) असे जखमी दुचाकीस्वराचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार संतोष सुपेकर यांनी सोमवारी (दि. 19) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पीएमपी बसचालक पांडुरंग जगन्नाथ भिसे (वय 44, रा. शिवकल्याण नगर, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भिसे पीएमपी बस चालक आहे. तो रविवारी सकाळी साडेदहा वाजता पुणे-नाशिक महामार्गावरून चाकणकडून पुण्याकडे बस घेऊन येत होता. वाकी फाटा बस स्टॉपजवळ बस आली असता भिसे याने लेन बदलण्यासाठी निष्काळजीपणा केला. यामध्ये बसची एका दुचाकीला (एम एच 12 / सी एच 2293) जोरात धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार रविकांत नाईकरे गंभीर जखमी झाला. तसेच बस आणि दुचाकी या दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.