पीएमपी बसचालकाची वयोवृध्द दाम्पत्याला शिवीगाळ

0
572

पुणे, दि. १९ (पीसीबी) – बसमध्ये चढण्यास उशीर झाल्याने वयोवृध्द दाम्पत्याला पीएमपी बसचालकाने शिवीगाळ केल्याचे समोर आले आहे. ही घटना मंगळवारी (दि.१८) दुपारी चारच्या सुमारास अप्पा बळवंत चौक ते सांगवी पीएमपी बसमध्ये घडली.

सुषमा शरद महाजन (वय ७४) आणि शरद नारायण महाजन (वय ७८, राहणार रास्ता पेठ) असे या वयोवृध्द दाम्पत्याची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास पुणे मनपा येथील बसस्टॉपवर सांगवीला जाण्यासाठी शरद महाजन आणि सुधा महाजन हे दोघे थांबले होते. यावेळी अप्पा बळवंत चौक ते सांगवी ही बस तेथे आली. दोघांचेही वय जास्त असल्याने बसमध्ये चढण्यास त्यांना थोडासा उशीर झाला. यामुळे  बसचालक भलताच संतापला. यामुळे महाजनांचा चालकासोबत वाद झाला. तसेच संतापेल्या बसचालकाने दोघांनाही शिवीगाळकरत बसचा ब्रेक दाबून तुमचे दात पाडीन अशी धमकी दिली.

या घटनेनंतर घाबरलेल्या महाजनांनी त्यांच्या मुलाला फोन करून बोलावून घेतले व हकिकत सांगितली. सांगवीच्या शेवटच्या बसथांब्यावर मुलगा निलेश महाजन यांनी बसचालकाशी चर्चा करुन असे परत न वागण्याचे नम्रपणे सांगितले. रात्री आजींना या सर्व प्रकारामुळे मानसिक त्रास झाला.  त्यांनी पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालिकांकडे चालकाविरोधातील तक्रार अर्ज दाखल करुन कडक कारवाईची मागणी केली.