Pimpri

पीएमपीएमएल बस प्रवासादरम्यान चोरट्याने हातचालाखीने प्रवाशाचा लॅपटॉप पळवला

By PCB Author

January 06, 2021

मोरवाडी, दि.6 (पीसीबी) – पीएमपीएमएल बसने प्रवास करत असताना एका प्रवासी तरुणाचा लॅपटॉप अज्ञात चोरट्यांनी पळवून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 5) सकाळी सव्वा दहा वाजता मोरवाडी चौक ते आयसीआयसीआय बँक या दरम्यान घडली.

शुभम राजेर गांधी (वय 25, रा. सावेडी भिस्तबाग चौक, अहमदनगर) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सव्वा दहा वाजता फिर्यादी गांधी पीएमपीएमएलच्या बस क्रमांक 122 मधून मोरवाडी चौक ते आयसीआयसीआय बँक या दरम्यान प्रवास करत होते. प्रवास करत असताना त्यांची कपड्याची बॅग बस मधून हिसकावून नेली. त्यामुळे ते त्यांच्या जागेवरून उठले. त्यावेळी ते ज्या सीटवर बसले होते, तिथे त्यांनी त्यांची लॅपटॉप बॅग ठेवली होती. गांधी त्यांची कपड्यांची बॅग बघायला गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांची लॅपटॉप आणि लॅपटॉप बॅग असा एकूण 30 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरून नेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.