पिस्तुलाच्या धाकाने दुकानदाराकडे मागितली खंडणी..

0
276

गहुंजे, दि. १२ (पीसीबी) – दुकानात येऊन पिस्तुल लोड करीत एकाने दुकानदाराकडे खंडणी मागितली. ही घटना सोमवारी (दि. 10) रात्री दहा वाजताच्या सुमारास साईनगर गहुंजे येथे घडली.दिनेश मांगीलाल चौधरी (वय 32, रा. साईनगर गहुंजे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार देवा जमादार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे साई ट्रेडिंग कंपनी नावाचे साईनगर येथे दुकान आहे. सोमवारी रात्री फिर्यादी, त्यांची आई, वडील आणि कामगार दुकानात होते. रात्री दहा वाजताच्या सुमारास आरोपी देवा जमादार दुकानात आला. त्याने फिर्यादी यांना जबरदस्तीने पैसे मागितले. पैसे देण्यास फिर्यादी यांनी नकार दिला असता देवा याने पिस्टल काढून ते लोड केले आणि फिर्यादिवर रोखले. त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी यांची आई मध्ये आली असता देवाने तिच्यावर देखील पिस्टल रोखून जीवे मारण्याची धमकी दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील तपास करीत आहेत.