पिस्तुलाचा धाक दाखवून कार चोरण्याचा प्रयत्न

0
182

हिंजवडी, दि. २९ (पीसीबी) – कंपनीच्या गेटसमोर कारमध्ये बसलेल्या कार चालकाला पिस्तुलाचा धड दाखवून कार चोरून नेण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार सोमवारी (दि. 28) रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास टीसीएस कंपनीसमोर हिंजवडी येथे घडला.
योगेश गणेश शिंदे (वय 34, रा. कोंढवा खुर्द, पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंदे हे कार चालविण्याचे काम करतात. ते त्यांच्या कारमध्ये हिंजवडी येथील टीसीएस कंपनीच्या गेटसमोर भाड्याची वात पाहत थांबले होते. रात्री पावणेनऊ वाजताच्या सुमारास तीन अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आले. त्यातील एकाने त्याच्याकडील पिस्तुल शिंदे यांच्या डोक्याला लावले. दुस-या व्यक्तीने त्याच्याकडील पिस्तुल दाखवून शिंदे यांना दम दिला. तर तिस-या व्यक्तीने कोयत्याचा धाक दाखवून शिंदे यांना धमकावले. तिघांनी मिळून शिंदे यांची कार चोरून नेण्याचा प्रयत्न केला. शिंदे यांनी तिथून कारसह पळ काढला आणि गुन्हा नोंदवला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.