Bhosari

पिस्टल, रिव्हॉल्वर बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक

By PCB Author

January 18, 2022

दिघी, दि. १८ (पीसीबी) – बेकायदेशीरपणे पिस्टल आणि रोव्हॉल्वर जवळ बाळगल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 17) सकाळी सव्वानऊ वाजता मॅगझीन चौक, दिघी येथे करण्यात आली.

अजित उर्फ विकी गुप्ता (वय 28, रा. गंधर्वनगरी, मोशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक सागर शेडगे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजित याने त्याच्याकडे पिस्टल बाळगली असल्याची माहिती दरोडा विरोधी पथकाला मिळाली. त्यांसुर पोलिसांनी मॅगझीन चौक, दिघी येथील एका बारच्या शेजारी सापळा लावून अजित याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक लोखंडी पिस्टल, एक जिवंत काडतूस, एक लोखंडी रोव्हॉल्वर असा एकूण 60 हजार 200 रुपयांचा अवैध शस्त्रसाठा आढळून आला. शस्त्र जप्त करत पोलिसांनी अजित याला अटक केली. दरोडा विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे तपास करीत आहेत.