पिपरी – चिंचवड महापालिकेवर खटला दाखल होण्याची शक्यता ?

0
712

पिंपरी, दि.७ (बीपीसी) – पवना नदीमध्ये गेल्या महिन्यात माशांच्या मृत्यू झाला होता.त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडाळाच्या अधिकाऱ्यांनी १८ डिसेंबर २०१९ रोजी नदीतील  पाण्याचे नमुने तपासणीसाठी महापालिका अधिकाऱ्याच्या उपस्थितीत  घेतले आहेत. हे पाणी दूषित असल्याचा अहवाल आल्यास खटला दाखल होण्याची शक्यता  आहे.

या पाण्याच्या  नमुन्याची तपासणी प्रयोग शाळेत सरू आहे. त्याचा अहवाल काही दिवसात येणार आहे. या पाण्याच्या नमुन्यांमध्ये कोणते घटक आहेत? आईल, ग्रीस त्यामध्ये  मिसळलेले जाते का? याची तपासणी करण्यात येणार, असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

दि ४ डिसेंबर २०१९ रोजी पवना नदी पात्रात अनेक ठिकाणी मासे मृत अवस्थेत आढळले होते, ताथवडे स्मशानभूमी जवळील पवना नदीमध्ये कासव मृत अवस्थेत आढळले होते, केजुबाई बंधारा थेरगाव येथील पवना नदीमध्ये पाण्याचा वाईट वास येत असल्याचे आढळले, त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या परिसराचे सर्वेक्षण केले होते. हा प्रकार नेमका कशामुळे घडला? याचा शोध घेतला होता. त्यावेळेस सहा ठिकाणी नाल्याचे सांडपाणी नदीमध्ये मिसळले जात असल्याचे आढळले होते. थेरगाव, रावेत, ताथवडे, या परिसरात कोणतेही औद्योगिक वसाहत नसून या भागामध्ये रहिवासी सोसायट्यांची संख्या अधिक  असल्यामुळे या माशांचा मृत्यू होत, असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. या संदर्भात  नाल्यामधून थेट नदीत जाणारे घरगुती सांडपाणी प्रक्रिया  प्रकल्पाकडे वळवावे, अशी नोटीस प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून महापालिका प्रशासनाला देण्यात आली होती. त्यानंतर महापालिकेने त्यासंदर्भात उपाययोजना करण्याची आवश्यकता होती.