पिढ्या वाया घालवण्यासाठी खर्च करायचा का? पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना सवाल

0
569

बीड, दि. १७ (पीसीबी) – खर्च नेमका कशावर करायचा? करमणुकीच्या कार्यक्रमावर करायचा? की पिढ्यांना वाया घालवण्यासाठी करायचा? का उत्सवाच्या नावाखाली चुकीची प्रथा राबवण्यासाठी करायचा? असा सवाल करून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या आरोपांना आज (बुधवार) प्रत्युत्तर दिले. 

शिर्डीमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामविकास विभागाच्या कार्यक्रमावर सरकारने दोन कोटी रुपयांचा खर्च केला आहे. हा खर्च करून पैशाची उधळपट्टी केल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला होता. या आरोपाला पंकजा मुंडे यांनी उत्तर दिले.

राज्यातील अडीच लाख बेघरांना घर मिळत आहेत, त्यामुळेच विरोधकांना पोटशूळ उठला आहे. सरकारने राबविलेल्या योजनांचा प्रसार, प्रचार आणि प्रसिध्दी करण्यासाठी तो खर्च करण्याचे अधिकार आहेत, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.
दरम्यान, शिर्डीत शुक्रवारी (दि. १९) पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत पंतप्रधान आवास योजनेचा ई-गृहप्रवेश कार्यक्रम होत आहे. ग्रामविकास खात्यामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.