पिकांचे प्रमाण पाहून राज्य सरकारने या सर्व उत्पादीत पिकांची खरेदी करावी – चंद्रकांत पाटील

0
282
कोल्हापूर, दि.१२ (पीसीबी) – राज्याच्या विविध भागात जमिनीचा पोत लक्षात घेऊन शेतकरी पिकांचे उत्पादन घेतात. त्याचे प्रमाण कमी-जास्त असल्याने केंद्र सरकारकडूच्या हमीभावाच्या यादीत त्याचा समावेश नाही. अशा पिकांचे प्रमाण पाहून राज्य सरकारने या सर्व उत्पादीत पिकांची खरेदी करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार  चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान केली.
पाटील म्हणाले की, महाराष्ट्राच्या विविध भागात जमिनीचा पोत लक्षात घेऊन शेतकरी अनेक पिके घेतात. त्यांचे प्रमाण कमी-जास्त असल्याने केंद्र सरकारकडून त्याला हमीभाव मिळत नाही. त्यामुळे अशी उत्पादने खरेदी करण्यासाठी राज्य सरकारने यंत्रणा उभारुन, संबंधित शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. राज्यात कापसाचे विक्रमी उत्पादन झाले आहे. सीसीआयच्या केंद्रातून याची खरेदी केली जाते. मात्र, विक्रमी उत्पादन पाहता राज्य सरकारकडून ही अशा प्रकारची केंद्रे सुरु करुन कापूस खरेदी करावी अशी मागणी पाटील यांनी यावेळी केली.