पिकविम्यासाठी आंदोलन छेडणारे; कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अटक

0
393

औरंगाबाद, दि, २५ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवणारे कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अटक करण्यात आली. पीकविमा आणि रस्त्याच्या कामासाठी रास्तारोको आंदोलन केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली.

सध्या राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी भीषण पाणी टंचाई भासत आहे, जनावऱ्यांच्या चाऱ्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. अनेक शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला नाहीये. तसेच जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्तेही झाले नाहीत, त्यामुळे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पीकविमा आणि रस्त्याच्या कामासाठी हातनूर येथे रास्तारोको आंदोलन केले. तब्बल ३  तास हे रस्ता रोको आंदोलन सुरु होते.

दरम्यान पीकविमा आणि रस्त्याच्या कामासाठी ३ तास रास्तारोको आंदोलन केल्यामुळे पोलिसांनी हर्षवर्धन जाधव यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. हर्षवर्धन जाधव हे कन्नडचे आमदार होते, त्यांनी मराठा आरक्षणाच्या अध्यादेशासाठी राजीनामा दिला होता. त्यानंतर औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, वंचित आघाडीचे इम्तियाज जलील यांच्या विरोधात त्यांनी अपक्ष लोकसभा निवडणूक लढली.