पिंपळे सौदागर येथे महिलेचा विनयभंग करुन लगट करण्याचा प्रयत्न; आरोपी अटक

592

चिंचवड, दि. १३ (पीसीबी) – महिलेजवळ जाऊन विनयभंग करत लगट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई वाकड पोलिसांनी मंगळवार (दि.१२) रोजी केली.

बाळासाहेब पाराजी होडगर (वय ४२, रा. केशवनगर, काकडे पार्क, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित ३३ वर्षीय महिला या मंगळवारी सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे उभ्या होत्या. यावेळी आरोपी बाळासाहेब हा त्यांच्याजवळ आला आणि त्याने त्यांचा विनयभंग करुन अश्लिल चाळे करत लगट करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी महिलेने तातडीने पोलीसात धाव घेतली. पोलिसांनी आरोपी बाळासाहेब याला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करत आहेत.