Chinchwad

पिंपळे सौदागर येथे कोयता बाळगुन दहशत माजवणाऱ्या रिक्षाचालकाला अटक

By PCB Author

February 18, 2019

चिंचवड, दि. १८ (पीसीबी) – कोयता बाळगुन परिसरात दहशत माजवणाऱ्या एका रिक्षा चालकाला कोयत्यासह पोलिसांनी अटक केली. ही कारवाई सांगवी पोलिसांनी रविवारी (दि.१७) रात्री दहाच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील हॉटेल गरीब नवाज समोर केली.

सलीम पापा शेख (वय ३४, रा. काटे पेट्रोलपंपाजवळ, पिंपळे सौदागर) असे अटक करण्यात आलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात कोयता बाळगल्या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री दहाच्या सुमारास सांगवी पोलीस गस्तीवर होते. यावेळी त्यांना माहिती मिळाली कि, पिंपळे सौदागर येथील हॉटेल गरीब नवाज समोर एकजण हातात कोयता घेऊन दहशत माजवत आहे. पलिसांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेऊन सलीम याला कोयत्यासह अटक केली. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.