पिंपळे सौदागर येथे आर्ट ऑफ लिव्हिंगचा ‘नवग्रह पुजा व सत्संग’ उत्साहात

0
559

चिंचवड, दि. २१ (पीसीबी) – पिंपळे सौदागर येथील पृथ्वीराज मंगल कार्यालयात आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचा ‘नवग्रह पुजा व सत्संग’  हा धार्मिक कार्यक्रम  उत्साहात पार पडला. स्वामी सुर्यतेज़जी यांच्या हस्ते पुजा करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका निर्मलाताई  कुटे व नगरसेवक शत्रुघ्न काटे  उपस्थित होते.

नकारात्मक गोष्टींचा मानवी शरीरातून  पूर्णपणे नाश करणे हा या नवग्रह पुजे चा उद्देश होता, असे आयोजक नरेश ख़ुशलानी,शषिकांत बोरगावकर व यतिन भंडारी यांनी सांगितले. नगरसेविका निर्मलाताई कुटे व नगरसेवक शत्रुघ्न काटे यांचा  ‘प्रेम उत्सव’   हे पुस्तक देऊन  सत्कार करण्यात आला.

यावेळी मनोगत व्यक्त करताना निर्मलाताई म्हणाल्या की,  विकासाच्या दिशेने पिंपळे सौदागर-रहाटणी वेगाने पुढे जात आहे. स्मार्ट सिटी च्या दिशेने पुढे पाऊल टाकत असतानाच संस्कृतीचा ठेवा देखील जपणे तितकेच महत्वाचे आहे. भविष्यात देखील अशा धार्मिक कार्यांचे आयोजन करुन स्मार्ट पिंपळे सौदागर सोबतच सांस्कृतिक पिंपळे सौदागर अशी ओळख निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.