पिंपळे सौदागरमध्ये हॉटेल ‘जस्ट इन ग्रील’ जळून खाक

0
2139

चिंचवड, दि. १३ (पीसीबी) – पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रस्त्यावर आज (गुरुवार) दुपारी चारच्या सुमारास हॉटेल “जस्ट इन ग्रील” जळून खाक झाले. या दरम्यान, बाजुला असलेले हॉटेल “एमएच २७ आणि हॉटेल विष्णू” या दोन्ही हॉटेलांना आगीची झळ बसल्याने नुकसान झाले.

घटनेची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली असून संत तुकारामनगर आणि रहाटणी अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले आहेत. आगिचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आग विझवण्याचे काम जलत गतीने सुरु आहे.