पिंपळे सौदागरमध्ये वृध्द आई-वडिलांना घरातून निघून जाण्याची धमकी देत जबर मारहाण

0
584

चिंचवड, दि. १८ (पीसीबी) – घरातून निघून जाण्याची धमकी देत मुलगा सुन आणि इतर दोघा जणांनी मिळून वृध्द आई-वडिलांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पिंपळे सौदागर येथील  ए-६०३, पूर्वा रेसीडेन्सी पिंपळे सौदागर येथे घडली.

चमनलाल दिनानाथ पंडीता (वय ७०, ए-६०३, पूर्वा रेसीडेन्सी पिंपळे सौदागर) असे गंभीर जखमी झालेल्या वृध्द इसमाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी सांगवी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यानुसार अनिल पंडीता, रवज्योत पंडीता, अमनदिप चुबंर आणि कुमारजी चुबंर (सर्व रा. ए-६०३, पूर्वा रेसीडेन्सी पिंपळे सौदागर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वृध्द चमनलाल पंडीता आणि त्यांची वृध्द पत्नी पिंपळे सौदार येथील ए-६०३, पूर्वा रेसीडेन्सी येथे राहतात. गुरुवार (दि. १३ सप्टेंबर) दुपारी साडेबाराच्या सुमारास आरोपी मुलगा अनिल, सुन रवज्योत, अमनदिप आणि कुमारजी या चौघांनी मिळून चमनलाल आणि त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करुन तुम्ही घरातून निघून जा असे म्हणत लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच त्यांच्याजवळील दोन मोबाईल फोडले. या घटनेत चमनलाल आणि त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सांगवी पोलिस तपास करत आहेत.