पिंपळे सौदागरमध्ये लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार

0
415

चिंचवड, दि. ९ (पीसीबी) – लग्नाचे आमिष दाखवून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. यात मुलगी गरोदर राहीली. हा प्रकार पिंपळे – सौदागर येथे आठ महिन्यापूर्वी घडला.

याप्रकरणी पीडित १६ वर्षीय मुलीने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिडीत मुलगी कामावर येत जात असताना गोविंद गार्डन येथील पुलाखाली आरोपीने तिच्याशी ओळख वाढविली. मुलीला एका ठिकाणी नेऊन आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. यातून मुलगी गरोदर राहिली. सांगवी पोलिस तपास करत आहेत.