पिंपळे सौदागरमध्ये महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने महिलेचा केला विनयभंग; गुन्हा दाखल

0
554

चिंचवड, दि. १४ (पीसीबी) – महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी महापालिकेच्या एका वैद्यकीय अधिकाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. २) सायंकाळी साडेचारच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे घडली.

याप्रकरणी ३३ वर्षीय पिडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी बाळासाहेब पाराजी होडगर (वय ४२, रा. केशवनगर, चिंचवड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित महिला या मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे थांबल्या होत्या. यावेळी महापालिकेत वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले बाळासाहेब होडगर महिलेजवळ आले. त्यांनी तिच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. तसेच अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न करुन विनयभंग केला. याप्रकरणी होडगर विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक व्ही. डी. मडके तपास करत आहेत.