पिंपळे सौदागरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास

0
593

चिंचवड, दि. २२ (पीसीबी) – घराला कुलुप लावून सिंगापुरला गेले असता एका महिलेच्या घरातील कपाटात ठेवलेले १ लाख ८७ हजारांचे सोने-चांदिचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरु नेले. ही घटना बुधवारी (दि.१४) सकाळी साडेनऊ ते शनिवार (दि.१८) दरम्यान पिंपळे सौदारगर येथील स्वराज गार्डनच्या पाठीमागच्या बाजूस असलेल्या मिथीला नगरी ५०२ या घरात घडली.

याप्रकरणी घर मालक महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्यादी आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या बुधवारी (दि.१४) सकाळी साडेनऊच्या सुमारास  पिंपळे सौदारगर येथील त्यांच्या घराला कुलुप लावून सिंगापुरला गेल्या होत्या. बुधवारी (दि.१४) सकाळी साडेनऊ ते शनिवार (दि.१८) या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करुन कपाटात ठेवलेले सोन्या-चांदिचे १ लाख ८७ हजार रुपये किमतीचे दागिने चोरुन नेले. याप्रकरणी महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सांगवी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.