पिंपळे गुरव येथे साडेपाच लाखांची घरफोडी

0
230

सांगवी, दि. १२ (पीसीबी) – अज्ञात चोरट्यांनी 12 तोळ्यांच्या दागिन्यांवर डल्ला मारून चोरी केली. हा प्रकार शुक्रवार (दि. 8) ते सोमवार (दि. 11) या कालावधीत नेताजी नगर, पिंपळे गुरव येथे घडला.

शिवशांत सुभाषराव जाधव (वय 34, रा. गणेश नगर, नवी सांगवी) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. 12) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे मामा ओंकार भालकेश्वर यांचे घर कुलूप लावून बंद होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातून 12 तोळे चार ग्रॅमचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम, असा एकूण पाच लाख 66 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.