Chinchwad

पिंपळे गुरव येथे राहत्या घरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

By PCB Author

March 03, 2019

चिंचवड, दि. ३ (पीसीबी) – राहत्या घराच्या छताला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन एका २२ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि. २) रात्रीच्या सुमारास पिंपळे गुरव येथील लक्ष्मीनगरमध्ये घडली.

कोमल भिमराव तुरेवाले (वय २२, रा. लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमल ही आपल्या नातेवाईकांसोबत पिंपळे गुरव येथील लक्ष्मीनगरमध्ये राहत होती. शनिवारी रात्रीच्या सुमारास कोमलने राहत्या घराच्या छताला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब लक्षात येताच तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. कोमलने आत्महत्या का केली हे अद्याप समजु शकले नाही. सांगवी पोलीस तपास करत आहेत.