पिंपळे गुरव येथे भांडण मिटवण्यासाठी बोलवून तरुणाला सिमेंटच्या गट्टूने मारहाण

0
547

चिंचवड, दि. १४ (पीसीबी) – पूर्वी झालेली भांडण मिटवण्यासाठी बोलवून एका तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारुन गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना शनिवारी (दि.१३) दुपारी चारच्या सुमारास पिंपळे गुरव येथील हॉटेल मैफिल समोरील सार्वजनिक रस्त्यावर घडली.

निखील अनिल चव्हाण (वय २९, रा. सर्वे क्र. ८२, लेन क्र.४, आदर्शनगर, नवी सांगवी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, महेश माने आणि त्यांच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी महेश आणि जखमी निखील या दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. हे भांडण मिटवण्याचे नाटक करुन महेश ने निखील याला शनिवारी दुपारी चारच्या सुमारास पिंपळे गुरव येथील हॉटेल मैफिल समोरील सार्वजनिक रस्त्यावर बोलवून घेतले. तसेच “माझी माफी माग नाहीतर तुझ्या कुटुंबाला संपवून टाकीन”, अशी धमकी दिली. यादरम्यान महेश याच्या दोघा साथीदारांनी निखील याला पकडून ठेवले तर महेश याने सिमेंटचा गट्टू निखील याच्या डोक्यात मारुन जखमी केले. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश खारगे तपास करत आहेत.