Chinchwad

पिंपळे गुरव येथे गॅस कटरने एटिएम मशीन कापून चोरट्यांनी पळवळी सव्वासात लाखांची रोकड

By PCB Author

February 22, 2019

चिंचवड, दि. २२ (पीसीबी) – एटिएम मशीन सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारुन अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरने एटिएम कापले आणि त्यातील एकूण ६ लाख ७५ हजार ७०० रुपयांची रोकड चोरुन नेली. ही घटना १८ ते २० फेब्रुवारी दरम्यान पिंपळे गुरव येथील नावेचा रोड, ओम मेडीकल शेजारी असलेल्या बँक ऑफ इंडीयाच्या एटिएम सेंटरवर घडली.

याप्रकरणी जगदीश सुरेश गणेशकर (वय ३३, रा. विशालनगर, पिंपळे निलख) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ ते २० फेब्रुवारी दरम्यान अज्ञात चोरटे हे पिंपळे गुरव येथील नावेचा रोड, ओम मेडीकल शेजारी असलेल्या बँक ऑफ इंडीयाच्या एटिएम सेंटरमध्ये घुसले. या चोरट्यांनी प्रथम एटिएम मशीन सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारुन फुटेज बंद केले. त्यानंतर गॅस कटरच्या सहायाने एटिएम कापून त्यातील एकूण ६ लाख ७५ हजार ७०० रुपयांची रोकड चोरुन नेली. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.