Notifications

पिंपळे गुरव येथील श्री ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या नेपाळी टोळीला पोलीसांनी केले जेरबंद

By PCB Author

December 04, 2018

चिंचवड, दि. ४ (पीसीबी) – श्री ज्वेलर्स या सोने-चांदीचे दागिने विक्री करणाऱ्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या नेपाळी टोळीला गुन्हे शाखा, युनिट दोनच्या पथकाने हत्यारांसह अटक केली. ही कारवाई आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास नर्मदा लॉन्सच्या बाजूला असलेल्या भंगाराच्या दुकानामागील मोकळ्यात मैदानात करण्यात आली.