पिंपळे गुरव येथील महादेवाच्या मंदिराचा सभामंडप कोसळून तीन कामगारांचा मृत्यू, ९ गंभीर जखमी

0
831

चिंचवड, दि. २० (पीसीबी) – पिंपळे गुरव येथील स्माशान भुमीजवळील पवना नदीकाठी असलेल्या महादेवाच्या मंदिराचे दगडी बांधकाम आज (बुधवार) सायंकाळी पावनेचारच्या सुमारास सुरु होते. यावेळी सभा मंडपाचे काम सुरु असताना कामगारांच्या अंगावर अचानक सभामंडप कोसळला, त्या घटनेमध्ये तीन कामगारांचा मृत्यू झाला असून ९ ते १० जण गंभीर जखमी झाले आहेत.

चिदम्मा पुजारी (वय ३५, रा. खडकी), मंतोष संजीव दास (वय ३०, रा. पश्चिम बंगाल) आणि प्रेमचंद शिगु रावकर (वय ३५, रा. पश्चिम बंगाल) असे मृत कामगारांची नावे आहे. तर ९ ते १० जण गंभीर जखमी आहेत. त्यातील काहींना औंध हॉस्पिटल, वायसीएम हॉस्पीटल आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेचे वृत्त समजताच नगरसेवक शशिकांत कदम, महेश जगताप आणि उशा मुंढे यांनी तातडीने घटना स्थळी धाव घेत जखमींना मलब्याखालून बाहेर काढण्यास मदत केली. जखमींना पिंपरीतील वायसीएम, औंध रुग्णालयात आणि खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये सिध्दांम्मा, संतोष आणि प्रेमचंद या तिघांचा मृत्यू झाला आहे. घटना स्थळी सध्या जेसीबीच्या सहायाने मलबा काढण्याचे काम सुरु आहे.