पिंपळे गुरव येथील राहत्या घरात वृध्दाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने हळहळ

0
825

चिंचवड, दि. ११ (पीसीबी) – एका ६५ वर्षीय वृद्धाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत राहत्या घरात आढळल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना रविवारी (दि. १०) दुपारी साडेबाराच्या सुमारास पिंपळे गुरव येथून उघडकीस आली.

चंद्रकांत गेनू भोसले (वय ६५, रा. सुवर्णपार्क, पिंपळेगुरव) असे मृत वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत हे पिंपळेगुरव येथील घरात आपल्या मुलासोबत राहत होते. काही दिवसांपूर्वी त्यांची पत्नीचा मृत्यू झाला होता. त्यांचा मुलगा तीन दिवसांपूर्वी बाहेरगावी गेल्याने ते घरात एकटेच होते. यादरम्यान, चंद्रकांत यांच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांना उग्र वास येऊ लागल्याने त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दार उघडले असता चंद्रकांत यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. चंद्रकांत हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. या आजारामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.