पिंपळे गुरवला हातात कोयता घेऊन पाच वाहनांची तोडफोड

0
653

चिंचवड, दि. १६ (पीसीबी) – पाच जणांच्या टोळक्यांने हातात कोयता, सिंमेटचा गट्टू घेऊन दोन रिक्षा, दोन दुचाकीसह एका वाहनाची तोडफोड करून नुकसान केले. तसेच एकाच्या कानाशिलात लगावून त्याच्या खिशातील १ हजार २०० रूपये जबरदस्तीने काढून घेतले. हा प्रकार पिंपळे गुरव येथे शनिवारी (दि.१४) मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास घडला.

या प्रकरणी विनोद रतन गायकवाड (वय ३१, रा. गांगर्डेनगर, पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार डॅनियल चांदणे, जोग्या, लाल्या, अभिजित ढमाले (सर्व रा. जुनी सांगवी) गणेश मोटे (रा. पिंपळे गुरव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रतन गायकवाड शनिवारी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास जेवण करून राहत्या घराच्या बाहेर बसले होते. त्यावेळी आरोपी दोन दुचाकीवरून तेथे येऊन रतन याला दमदाटी केली. त्यानंतर आरोपी जोग्या रतन यांना म्हणाला, येथे का बसला आहेस. योग्या जगतापाच्या जिवावर उड्या मारता का? त्याच्याकडे आता बघतोच,  असे म्हणून रतन याच्या कानाखाली चापट लावली. तसेच त्याच्या शर्टाच्या खिशातील  सुमारे १ हजार २०० रूपये काढून घेतले.

त्यानंतर रतन यांच्या रिक्षासह आणखी एक रिक्षा, दोन दुचाकी आणि इतर  एका वाहनाची अशा पाच वाहनांची कोयता आणि सिंमेटच्या गट्टूने तोडफोड करून मोठे नुकसान केले.

या प्रकरणाचा सांगवी पोलीस अधिक तपास करत आहे.