पिंपळे गुरवमध्ये मुलीला मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार

0
3048

चिंचवड, दि. १ (पीसीबी) – विवाहितेच्या मुलीला आणि घरच्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन एका नराधमाने वेळोवेळी लॉजवर आणि विवाहितेच्या घरी जाऊन तिच्यावर बलात्कार केला. ही घटना पिंपळे गुरव येथे जानेवारी ते २९ ऑक्टोबर २०१८ दरम्यान घडली.

याप्रकरणी पीडित विवाहित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार नेताजी विश्वनाथ सुर्यवंशी (वय २८, रा. सिध्दिविनायक कॉलनी वाल्हेकरवाडी, चिंचवड) या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहित महिला या चिंचवड येथील जावेद हबीब ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षनासाठी जात होत्या. यावेळी आरोपी नेताजी सुर्यवंशी याने पीडितेचा पाठलाग करुन तिच्या मुलीला आणि घरच्यांना जीवेठार मारण्याची धमकी दिली. तसेच वेळोवेळी धमकी देत तिच्या घरी जाऊन आणि पिंपळे गुरव येथील लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात आरोपी सुर्यवंशी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अलका सरग तपास करत आहेत.