Chinchwad

पिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक

By PCB Author

December 18, 2018

चिंचवड, दि. १८ (पीसीबी) – मजुर तरुणीच्या घरात घुसून दोन तरुणांनी अश्लिल वर्तन करत तिच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न करुन विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि.१६) सायंकाळी सातच्या सुमारास वैधवस्ती पिंपळे गुरव येथील घरात घडली.

याप्रकरणी पीडित २१ वर्षीय तरुणीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, साईनाथ प्रल्हाद राठोड (वय १९) आणि मलेश गोविंद राठोड (वय १९) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २१ वर्षीय तरुणीने ही मजुरीचे काम करुन पोट भरते. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास पीडित २१ वर्षीय तरुणी वैधवस्ती पिंपळे गुरव येथील तिच्या बहिणीच्या घरी गेली होती. यावेळी आरोपी साईनाथ आणि मलेश हे दोघे तिच्या घरी गेले. तसेच तिच्यासोबत अश्लिल वर्तन करत तिच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न करुन विनयभंग केला. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी साईनाथ आणि मलेश या दोघांना अटक करण्यात आली आहे.