Chinchwad

पिंपळे गुरवमध्ये फ्लॅटचे कुलुप तोडून चोरट्यांचे लांबवले सव्वा लाखांचे दागिने

By PCB Author

February 20, 2019

चिंचवड, दि. २० (पीसीबी) – फ्लॅट कुलुप लावून बंद असताना अज्ञात चोरट्याने कुलुप तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश करत कपाटात ठेवलेले ७१.०१ वजनाचे १ लाख ३६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. ही घटना पिंपळे गुरव येथील सुदर्शननगर येथील धृवांकुर बिल्डींगमधील फ्लॅट क्र. ५ येथे घडली.

याप्रकरणी फ्लॅटचे मालक प्रवीण जयवंत गायकवाड (वय २९) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.१७) फिर्यादी प्रवीण हे त्यांच्या धृवांकुर येथील फ्लॅटला कुलुप लावून बाहेर गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी कुलुप तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश करत कपाटात ठेवलेले ७१.०१ वजनाचे १ लाख ३६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. प्रवीण घरी आल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत.